देश- विदेशसांगोला

सांगोला पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोरणाऱ्याला दाखवले आसमान; ६ लाख २० हजारचे ८ गाड्या जप्त


सांगोला / प्रतिनिधी: सांगोला शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना विशेष निर्देश दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, जत तालुक्यातून काही आरोपी सांगोल्यात येऊन मोटारसायकल चोरी करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक गठीत करण्यात आले.

हे पथक जत तालुक्यात दोन दिवस पाळत ठेवून संशयितांचा शोध घेत होते. यावेळी लक्ष्मीनगर, जत (जि. सांगली) येथील गोविंद उर्फ पवन राजू काळे यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याने सांगोला शहरासह पंढरपूर शहर, सोलापूर तालुका व मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीसांनी त्याच्याकडून पाच बुलेटसह तीन इतर मोटारसायकली, एकूण ८ गाड्या जप्त केल्या असून, त्यांची किंमत सुमारे ६ लाख २० हजार रुपये इतकी आहे.

जप्त गाड्यांविषयी संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून खातरजमा केली असता संबंधित गुन्हे तेथे ही दाखल असल्याचे स्पष्ट झाले. सर्व गाड्या पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या असून, पुढील तपास पोलीस नाईक बाबासाहेब पाटील करत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


तपासामध्ये पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, तसेच सायबर शाखेचे पो.हे.कॉ. युसूफ पठाण यांचा मोलाचा सहभाग होता.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button