देश- विदेशसांगोला

Forest Department : वन विभागाची धडाडीची कारवाई; अवैध जंगलतोड, वाहतूक करणाऱ्या वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त!


सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला वनविभागाने (Forest Department) मागील काही दिवसांत अवैध जंगलतोड आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर सांगोला (प्रादेशिक) वन विभाग यांनी छापे टाकून लाखोंचा मुद्देमाल आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला मौजे बाळेगाव येथे फिरती करत असताना विनापरवाना कोळसा वाहतूक मालकी क्षेत्रात ट्रॅक्टर क्रमांक MH 10 D 1. 7170 कोळसा पोती १८ विनापरवाना बाहतूक होत असल्यामुळे वनविभागाचा वाहतूक परवाना पास नसल्यामुळे ट्रैक्टर ट्रॉली कोळसा गालासह जप्त केला.  

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा प्रथम गुन्हा क्रमांक 01/2025 नॉद केला. आरोपी विवेक वसंत शिंदे रा. वाडेगाव व इतर पाच व्यक्ती यांच्यावर वनगुन्हा नोंद केला. कोळसा पोती 95 बाजार भाव किमत अंदाजे 60,000/- रुपये आहे. सदरचा ट्रॅक्टर ट्रॉली कोळसा मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला मौजे मेडशिंगे येथे फिरती करत असताना मालकी क्षेत्रात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कोळसा पोती 108 अवैध वाहतूक करण्यासाठी भरून ठेवली होती. ट्रॉलीसह कोळसा पोती 108 जपत कैली. वनविभागाचा वाहतूक परवाना नसल्यामुळे कारवाई केली, आरोपी आरोपी विवेक वसंत शिंदे राहणार बाडेनाव व इतर पाच व्यक्तीवर वनगुन्हा नोंद केला.  

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा प्रथम गुन्हा क्रमांक ओ-02/2025 सहा व्यक्तीवर बनगुन्हा नोंद केला. सदरचे कोळसा पोती 108 बाजार भाव किंमत 71000/- रुपये होईल, ट्रॉलिव कोळसा मालासह जप्त करप्न वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला कार्यालयाजवळ ठेवली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी, वनरक्षक धेरडी सर्वजण मौजे डिकसळ परिसरात फिरती करत असताना ट्रॅक्टर नं.MH 45A 5660 मध्ये कडुलिंब इमारती नग 20 त्याचे घ.मी 3.916 आहे. विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले.  

वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना नसल्यामुळे ट्रॅक्टर लाकूडमाला सहज जप्त केला. उनरक्षक घेरडी यांचा प्रथम गुन्हा क्रमांक 01/2025 नोंद केला आहे. आरोपी सचिन संभाजी गावडे इतर तीन चार व्यक्तीवर वनगुन्हा नोंद केला आहे. सदरचा ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यानयात आणून ठेवला आहे. जप्त लाकुड मालाची बाजार भाव प्रमाणे किंमत 25,000/- रुपये आहे. वरील प्रमाणे अनुक्रमे 1 ते 3 वनगुन्हे 10 दिवसापुर्वी नोंद केली आहे. वाहन व लाकुड माल व कोळसा पोती जप्त करून कार्यालयाजवळ ठेवला आहे. पुढील तपास चालु आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला दि. 17.06.2025 रोजी मौजे कडलास मानेगाव हातीद परिसरात रात्री 10.30 च्या दरम्यान राज्यस्त करत असताना वाहनांची तपासणी केली असता टाटा आयशर MH 45 0035 त्यामध्ये कडुलिंब, चिंच प्रजातीचे जळावू लाकूड 21.42 धनमीटर अवैध दिसून आले.

वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना नसल्यामुळे आरोपी सागर नारायण काशीद रा. कडलास व इतर एक यांच्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी प्रथम गुन्हा क्रमांक. 03/2025 दि.17.06.2025 नाँद केला आहे. सदरचा टाटा आयशर लाकूड मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला जवळ ठेवला आहे. पुढील तपास चातु आहे.

लोकांना आव्हान करण्यात येत आहे की, मालकी क्षेत्रातील झाडे विनापरवाना वृक्षतोड केल्यास व विनापरवाना बाहतूक केल्यास व वन्यप्राणी शिकार केल्यास, वनक्षेत्रात अतिक्रमण केल्यास वनक्षेत्रामध्ये वृक्षतोड केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सदरची कारवाई 1) मा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे एन.आर.प्रवीण 2) मा. उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते अतिरिक्त कार्यभार सोलापूर 3) सहाय्यक वन संरक्षक सोलापूर (कॅम्पा) विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर तसेच वनपाल सांगोला, वनपाल जुनोनी, वनरक्षक घेरडी, वनरक्षक सांगोला, वनरक्षक महुद बु।। यांनी केली


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button