रोटरी चे काम करत मी आमदार झालो : आमदार प्रवीण स्वामी

पंढरपूर : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने डी टी एल एस म्हणजे डिस्ट्रिक्ट टीम लर्निंग सेमिनार चे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रो डॉ. महेश कोटबागी माजी आर आय डायरेक्टर व रो. श्री प्रवीण स्वामी आमदार उमरगा विधानसभा हे उपस्थित होते अशी माहिती डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल श्री सुधीर लातूरे यांनी दिली.
या कार्यक्रमात बोलताना रो. डॉ. महेश कोटबागी यांनी रोटरीचे जगभरातले काम व भारतातले काम आणि त्यामुळे समाजात होणारा सकारात्मक बदल याविषयी भाष्य केले. रोटरीमुळे अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जो बदल अपेक्षित आहे त्यासाठी प्रत्येक रोटेरियन यांनी मनापासून काम करणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतातील रोटरी ही जगाच्या नकाशावर अगदी ठळकपणे सर्व रोटेरियन कामातून दिसत आहे व रोटरीने जगाच्या पोलिओ निर्मूलनामध्ये जे योगदान दिले आहे ते इतिहासामध्ये अगदी ठळकपणे अधोरेखित झाले आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे रो. आमदार श्री प्रवीण स्वामी यांनी सांगितले की गेल्या वीस वर्षापासून रोटरीच्या माध्यमातून जे सामान्य माणसांचे प्रश्न मी सातत्याने सोडवत गेलो त्यामुळे एका सामान्य शिक्षकाला रोटरीच्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाता आले ही रोटरीच्या सामाजिक कार्याची ताकद आहे.
डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल श्री सुधीर लातूर यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना पुढील वर्षी रोटरीच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले जाणार आहेत त्याची माहिती दिली व उपस्थित सर्व रोटेरियन यांना समाजातील मूलभूत प्रश्नावरती काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी माजी प्रांतपाल डॉक्टर राजीव प्रधान, श्री इस्माईल पटेल,श्री जुबीन अमारिया, श्री किशोर पावडे, श्री शिरीष रायते, श्री मोहन देशपांडे, डॉक्टर दीपक पोफळे, श्री हरिष मोटवानी, डॉ. ओमप्रकाश मोतीपावळे, स्वाती हेरकल, डॉ. सुरेश साबू व श्री जयेश पटेल हे उपस्थित होते या सर्वांनी वेगवेगळ्या सत्रांच्या मार्फत उपस्थित सर्व रोटेरीयन्स यांचे वेगवेगळ्या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी डॉक्टर कैलाश करांडे यांनी कन्व्हेनर म्हणून काम पाहिले त्यांच्यासोबत श्री लितेश शहा यांनी फोरम लीडर म्हणून काम पाहिले रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष श्री सोमेश गानमोटे व पंढरपूर रोटरी क्लबचे सर्व सदस्य यांनी हा कार्यक्रम हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. रो. नितीन कुदळे, रो. रवींद्र बनकर, रो. हमीद शेख, रो. यशवंत हांडे, रो. प्रसाद वरद, रो. विशाल जैन या सर्वांनी सहकार्य केले.