महाराष्ट्र

महायुती सरकार तीन शिफ्टमध्ये काम करतंय – अजित पवार


“मी पहाटेपासून, फडणवीस दुपारी, शिंदे रात्री काम करतात”

पुणे/ प्रतिनिधी:  पमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन आणि २० नवीन दवाखान्यांचे उद्घाटन करताना महायुती सरकार २४ तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचा दावा केला. सरकार तीन ‘शिफ्ट’मध्ये काम करतं, अशी गंमतीदार पण ठळक टिप्पणी करत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कामाच्या वेळा उघड केल्या.

“मी पहाटे ४ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. देवेंद्र फडणवीस सकाळी ११ ते दुपारी २ आणि एकनाथ शिंदे रात्री २ ते ४ काम करतात. त्यामुळे सरकार २४ तास कार्यरत आहे,” असे अजित पवार म्हणाले.

दहशतवादावर कडक भाष्य – “पाकिस्तानला जागा दाखवली पाहिजे”

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

“ही घटना संपूर्ण भारताने गांभीर्याने घेतली पाहिजे. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली पाहिजे. अशा भ्याड हल्ल्यांचं मूळच उखडलं पाहिजे. भारतीय सेनेवर पूर्ण विश्वास आहे की, त्यांनी हे योग्यरीत्या हाताळावं,” असंही ते म्हणाले.

दवाखाने, सरकारी इमारतींसाठी नव्या योजना

कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत २० नव्या दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी सरकारी इमारतींबाबत सरकारच्या नव्या धोरणांची माहिती दिली.

  • सरकारी कार्यालये भाड्याने न ठेवता स्वतःच्या जागांमध्येच निर्माण करण्यावर भर
  • सर्व सरकारी इमारतींवर सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्मितीचा विचार
  • पार्किंगच्या समस्या टाळण्यासाठी नव्या इमारतींमध्ये विशेष व्यवस्था
  • आरोग्य सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय

“मला सरकारी कार्यालयं चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत,” असं सांगत त्यांनी येत्या दोन-तीन वर्षांत सर्व कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. “सर्व सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवले जातील आणि वीज निर्मिती कशी करता येईल, याचा विचार सुरू आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू आहे.” असेही अजित पवार म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button