महाराष्ट्रदेश- विदेशसांगोला

सांगोला येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी


सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहर व तालुक्यात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने समस्त वीरशैव लिंगायत समाज आणि महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्यावतीने २७ एप्रिल ते १ मे दरम्यान खंडोबा मंदिर व मारुती मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदेश पलसे यांनी दिली.

कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे :

  • २७ एप्रिल :
    सकाळी १० वाजता चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा (इ. १ली ते ४थी आणि ५वी ते १०वी गटांसाठी)
    सायंकाळी ६ वाजता वैयक्तिक नृत्य स्पर्धा
  • २८ एप्रिल :
    सायंकाळी ६ वाजता महिला व मुलींसाठी फनी गेम्स
  • २९ एप्रिल :
    सायंकाळी ७.३० वाजता कु. सृष्टी सुनील लिगाडे यांचे विशेष व्याख्यान
  • ३० एप्रिल :
    सकाळी ८ वाजता मोटरसायकल रॅली, त्यानंतर १० वाजता पुष्पवृष्टी
    दुपारी ४ वाजता वीरशैव महिला भजनी मंडळाचे भजन कार्यक्रम
    सकाळी ११ वाजता सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण
  • १ मे :
    दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांसाठी स्पर्धकांना रोख बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वर युवक संघटना व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी मो. ९७६४६४२१२२, ९५६१५३७९७२ ९६६५४३५८३१, ९७६४०३१९३२, ९१७२३७१०४४, ९५०३४९२२८८ यांच्याशी संपर्क साधावा.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button