देश- विदेशमहाराष्ट्र
Mahashivratri : महाशिवरात्री महिलांसाठी फलप्राप्ती देणारी; जाणून घ्या शिवलिंग पूजनाची महिमा
पाहा शिवलिंगावर जल अर्पण करण्याचा मंत्र

महाशिवरात्री विशेष : महाशिवरात्रीचे महत्त्व फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाणारी महाशिवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सर्व संकटांचे निवारण होते आणि ईश्वरी कृपा प्राप्त होते. महिलांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. सुखी वैवाहिक जीवनासाठी अनेक महिला या दिवशी निर्जला व्रत करतात.
महाशिवरात्री पूजेची विधी
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालीलप्रमाणे पूजन करावे :
- शिवलिंग अभिषेक : जल, दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल अर्पण करावे.
- पुष्पार्पण : बेलपत्र, धतूरा, चंदन, अक्षत, भस्म आणि पांढऱ्या फुलांनी पूजन करावे.
- आरती व भजन : धूप, दीप लावून महादेवाची आरती करावी आणि भजन गावे.
- शास्त्र पठण : शिवपुराण, रुद्राष्टक यांचे पठण केल्याने अधिक फलप्राप्ती होते.
महाशिवरात्री व्रताचे नियम
- सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत.
- व्रत संकल्प करून भगवान शिवाचा ध्यास घ्यावा.
- निर्जला उपवास शक्य नसेल तर फळाहार करावा.प्याज, लसूण व तामसिक अन्न टाळावे.
- महाशिवरात्री व्रताचे नियम
- ॐ नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
- क्रोध, अहंकार व निंदा टाळावी, संयमित आणि शांत राहावे.
- रात्रभर जागरण करून चार प्रहरांत शिवलिंगाची पूजा करावी.
शिवलिंगावर जल अर्पण करण्याचा मंत्र
मन्दाकिन्यास्तु यद्वारि सर्वपापहरं शुभम्।
तदिदं कल्पितं देव स्नानार्थं प्रतिगृह्यताम्॥
श्रीभगवते साम्बशिवाय नमः। स्नानीयं जलं समर्पयामि॥