महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटमध्ये घोटाळा
प्रत्येक परीक्षेला करोडोंची लुट, संस्थाचालक म्हणाले...

पुणे/रोहित हेगडे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात जीसीसी-टीबीसी म्हणजेच कॉम्प्युटर टायपिंग तसेच मॅन्युअल टायपिंग या परीक्षा वर्षातून दोन टर्ममध्ये घेतल्या जातात. शासकीय क्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक असलेली टायपिंग परीक्षा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांत परीक्षा परिषदेमध्ये अनेक घोटाळे उघड झाले आहेत. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार उघडकीस आले असून, काही विद्यार्थ्यांना परीक्षेला न बसवता सरळ उत्तीर्ण केल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. मात्र, यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, अलीकडेच डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी परीक्षेच्या सर्टिफिकेटमध्ये प्रचंड मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांचे सीट नंबर, सेंटर नंबर, इन्स्टिट्यूट कोड, विषयाचे नाव तसेच त्यांना मिळालेले गुण चक्क गायब झाले आहे. विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाची बोगस सर्टिफिकेट्स देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक टायपिंग इन्स्टिट्यूटकडून बोगस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सहभागाचा संशय व्यक्त केला जात आहे. हे सर्टिफिकेट खरोखरच कोणत्या संस्थेने दिले आहे किंवा परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीच ही चूक केली आहे? याचा तपास होणे आवश्यक आहे.
प्रत्येक परीक्षेला करोडोंची लुट, संस्थाचालक म्हणाले…
काही संस्थाचालकांना अधिकारी,कर्मचारी यांचेकडून शासकीय कामासाठी पैशासाठी मागणी करतात आणि पैसे दिले नाही ते त्यांचे काम न करत खोटी कारणे देत फसवणूक करण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. यावर कोणाचे नियंत्रण आहे का? अश्या लाचखोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे असे संस्थाचालक म्हणाले.
शिक्षण क्षेत्रातील अशा प्रकारच्या भोंगळ कारभारावर कठोर कारवाई करावी : विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, या गैरव्यवहारासाठी जबाबदार कोण, असा सवाल संस्थाचालक, विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. शिक्षण क्षेत्रातील अशा प्रकारच्या भोंगळ कारभारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक आणि तज्ञांकडून केली जात आहे. परीक्षा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या टायपिंग संस्थांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणीही होत आहे.
धक्कादायक! सोलापूर विद्यापीठ, उ.शि.सहसंचालकांच्या संगनमताने प्राध्यापकांची लुट करत कोट्यावधींचा भ्रष्टाचार?
या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर याचा गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यात होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रातील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.