देश- विदेश

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हाहाकार: मुंबईसाठी यलो अलर्ट, कोल्हापूरसाठी रेड, तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी


In Public News OnlineDesk : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभरात पूरपरिस्थिती व मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, तत्काळ नुकसानमूल्यांकन करण्यास सांगितले आहे.

मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, रायगड आणि इतर जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, पायाभूत सुविधांवर गंभीर परिणाम झाला आहे. आतापर्यंत 80 हून अधिक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. फळटण आणि मुंबई या अत्यंत संवेदनशील भागांमध्ये NDRF पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, रायगडमध्ये विजेच्या झटक्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट्स, भिंती कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.

महानगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button