महाराष्ट्रदेश- विदेशशैक्षणिक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात भाषेचा वाद? पाहा काय आहे नेमकं प्रकरण?

सीमा वादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी


इन पब्लिक न्यूज : चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसचालकाला अडवले. “तुला कन्नड भाषा येते का?” असे विचारल्यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासले आणि मारहाण केली.  या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी निषेध आंदोलन छेडले आहे. 

पाहा काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भाषेचा मुद्दाही आता तापत आहे.बेलगावमध्ये मराठी न बोलल्यामुळे मारहाण करण्यात आली. चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसचालकाला अडवले. “तुला कन्नड भाषा येते का?” असे विचारल्यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासले आणि मारहाण केली. ही माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेत कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एसटी बससेवा तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला.

‘मराठी-कन्नड’ भाषावाद पुन्हा उफाळला! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद… 

सीमा वादासोबत आता भाषेचा मुद्दाही ऐरणीवर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात अनेक मराठी भाषिक कन्नड न बोलता मराठीतच व्यवहार करतात. बेलगावमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोकसंख्या आहे, त्यामुळे याठिकाणी अशा वादांची पुनरावृत्ती होत असते. 

सीमा वादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

बेलगाव कर्नाटकचा भाग असला तरी, महाराष्ट्र त्याच्यावर हक्क सांगत आला आहे. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भाषिक आधारावर सीमांचे विभाजन झाले. परंतु महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमा वाद कायम राहिला आहे. 2022 मध्येही सीमा वाद चिघळला होता, तेव्हा बसवर दगडफेक आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. 

राजकीय पडसाद

या घटनेनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सीमा वादाच्या पाश्र्वभूमीवर आता भाषेच्या मुद्द्यावरूनही वाद वाढत असल्याने हा विषय अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button