महाराष्ट्र

सार्वजनिक न्यासामार्फत नागरिकांना सुलभपणे सेवा मिळण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

नागरीकांना मिळणाऱ्या सेवा सुलभ करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले


सोलापूर/राहुल कोळेकर : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धर्मादाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वस्तांची कार्यशाळा आज डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडली. या कार्यशाळेचा उद्देश धर्मादाय आयुक्त मुंबई अमोघ कलोती आणि धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या निर्देशानुसार नागरिकांना सेवा सुलभ करण्याचा होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी धर्मादाय उप आयुक्त प्रविण कुंभोजकर, सहायक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव, मानसशास्त्र तज्ञ डॉ. नितिन भोगे, जिल्हा अध्यक्ष खतिब वकील आणि अन्य विधि तज्ञ उपस्थित होते.

उप आयुक्त कुंभोजकर यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, “मुख्यमंत्र्याच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार नागरीकांना मिळणाऱ्या सेवा सुलभ करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.” त्यांनी कायदेविषक अडचणींवर मार्गदर्शन केले.

धक्कादायक! सोलापूर विद्यापीठात एक कोर्स अनं ४ कोटी १ लाख ६० हजारांची अफरातफर? अधिकाऱ्यांकडून लुट ?

डॉ. नितिन भोगे यांनी मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. खातीब वकील यांनी विश्वस्तांचे अधिकार, कर्तव्ये आणि संस्थांचे संगोपन याबाबत माहिती दिली. ॲड. अंबादास रायनी आणि ॲड. खोले यांनी संबंधित कायद्यांवर मार्गदर्शन केले.

सहायक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव यांनी दस्तऐवज अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना दिल्या. कार्यशाळेच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये विश्वस्तांच्या शंका समाधान करण्यात आल्या.

या कार्यशाळेतून विश्वस्तांना आवश्यक माहिती व कौशल्ये याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढून संस्थांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी चालना मिळणार आहे. तसेच अशा संस्थामार्फत सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सेवा अत्यंत सुलभ रीतीने मिळतील.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button