महाशिवरात्री विशेष : काशीची अनुभूती सांगोल्यातच; त्रिवेणी संगमावरील महादेव मंदिर
इन पब्लिक न्यूज'ची विशेष मुलाखत : पुजारी प्रविण घोंगडे यांनी सांगितले सांगोल्यातील त्रिवेणी संगम

महाशिवरात्री विशेष : ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ जे सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी असून वाढेगाव (ता. सांगोला) येथील त्रिवेणी संगम. हा त्रिवेणी संगम शिवभक्तांचे श्रद्धास्थान ठरले आहे. माण, कोरडा आणि अनुका नद्यांच्या संगमावर वसलेले हे प्राचीन शिवमंदिर भक्तांसाठी खास आकर्षण आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.
शिवमंदिराचा इतिहास आणि जीर्णोद्धार
इन पब्लिक न्यूजशी बोलताना पुजारी प्रविण घोंगडे (मो. 9527701671) म्हणाले, वाढेगावच्या पश्चिमेला असलेल्या या त्रिवेणी संगमावर ५०-६० वर्षांपूर्वी दगडी मंदिर बांधले गेले होते. मात्र, काळाच्या ओघात ते दुर्लक्षित झाले आणि झाडाझुडपांनी वेढले गेले. तरीही, भाविकांची श्रद्धा कायम राहिली आणि श्रावण सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येत राहिले.
भाविकांसाठी उत्तम सोयीसुविधा
इन पब्लिक न्यूजशी बोलताना पुजारी प्रविण घोंगडे पुढे बोलताना म्हणाले, मंदिर परिसरात भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छता राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगोला आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यटक येथे विरंगुळ्यासाठी येत आहेत.
त्रिवेणी संगम : पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार
राज्य शासनाने त्रिवेणी संगमाचा “क” वर्गातील तीर्थक्षेत्र आराखड्यात समावेश केला असून, २.५ कोटी रुपये निधीतून पर्यटनस्थळाचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच हे ठिकाण सांगोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील निसर्गप्रेमी आणि भक्तांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
पुजारी प्रविण घोंगडे म्हणाले, १८९२ साली साधूंचा निवास
अंदाजे १८९२ साली येथे एका साधूने वास्तव्य केले होते. त्यांची इच्छा होती की, आयुष्याच्या उत्तरार्धात काशीला जावे. मात्र, त्यांनी येथेच उत्तरवाहिनी नद्यांचा त्रिवेणी संगम आणि पवित्र मंदिर पाहून “मला येथेच काशी मिळाली!” असे म्हणत इथेच राहण्याचा निर्णय घेतला.
त्रिवेणी संगमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचा धार्मिक महत्त्व आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे हे ठिकाण लवकरच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येणार आहे.