प्रेम आंधळ असतं पण इतकं! तिचे २३ तर त्यांचे १३ वर्षे वय,अन राहिली ५ महिन्याची गर्भवती?

विशेष प्रतिनिधी : एका २३ वर्षांच्या महिला शिक्षिकेने अल्पवयीन १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शिक्षिका ५ महिन्याची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले असून, गर्भातील बाळ त्या विद्यार्थ्याचे असल्याचा दावा तिने केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा कोचिंगसाठी घरातून गेला पण परतलाच नाही. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्या शिक्षिकेने मुलासोबत शहरातून बाहेर पडल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिस शोध घेतला. ते दोघेही सूरतहून बडोदा, अहमदाबाद, दिल्ली, वृंदावन, जयपूर आणि उदयपूरमार्गे पुन्हा गुजरातमध्ये परतले. आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने तिचे आणि त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. या प्रकरणात शिक्षिकेवर अल्पवयीन मुलाचे अपहरण, पॉक्सो कायद्यान्वये लैंगिक अत्याचार आणि इतर संबंधित गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.