
विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरात पुन्हा एकदा मोठा आवाज झाला असून भूकंपाचे हादरे बसले आहेत. आज १० जून रोजी सकाळी ११.५६ वा मोठा आवाज झाला. या आवाजाने सांगोला हादरेल. यापूर्वी असेच “इन पब्लिक न्यूज”ने गूढ आवाजाबाबत तपासणी करून भूकंपाचे हादरे असल्याचे समोर आणले होते.
दरम्यान, भूकंपाचे धक्के की गूढ आवाज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना नाहीत. एप्रिलमध्ये असे झाले होते त्यावेळी नागरिकांनी याबाबत सांगोला तहसीलदार तसेच मुख्याधिकारी यांनी माहिती दिली होती परंतु एकमेकांवर त्यांनी ढकलून मोकळे झाले होते. याची जबाबदारी प्रशासन घेत नाही ? असे नागरिकांनी म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी एप्रिलमध्ये भूकंपाचे हादरे बसले होते. तब्बल दोन वेळा प्रचंड मोठा आवाज झाला. मिळालेल्या माहितीनूसार दोन वेळा भूकंपाचे हादरे बसल्याचे समोर आले आहे. या भूकंपाच्या हादऱ्याने यावेळी शहरातील घरे दुकाने हादरले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला शहरात एप्रिलमध्ये दुपारी २ आणि ४ च्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्याने संपूर्ण शहर हादरले असून याचा प्रचंड मोठा आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण शहरात पसरला. या धक्कामधून शहरातील घरे, साहित्य तसेच दुकाने व कार्यालय सुद्धा हादरले.