सांगोला / प्रतिनिधी : “आम्ही दोघेही अंध असून आपुलकी प्रतिष्ठानमुळे आमच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश आला. आपुलकीने आम्हाला खरी दृष्टी दिली,” असे भावनिक उद्गार दिव्यांग राजू बंडगर यांनी केले. आपुलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन राजू बंडगर आणि त्यांच्या पत्नी सुरेखा बंडगर या अंध दाम्पत्याच्या हस्ते नगरपरिषद पाठीमागे गाळा क्र. ३ येथे करण्यात आले.
या वेळी राजू बंडगर यांनी आपली मनोगते व्यक्त करत आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्याची मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशंसा केली.
मान्यवरांचा उपस्थितीत साधेपणात उद्घाटन सोहळा
कार्यक्रमात डॉ. प्रभाकर माळी बोलताना म्हणाले की, “आपुलकी प्रतिष्ठान समाजोपयोगी विविध उपक्रमांद्वारे गरजूंपर्यंत पोहोचत असून त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहे.“ त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, जसे की:
- शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप
- निराधार महिलांना शेळी, शिलाई मशीन, पिठ गिरणी वाटप
- दिव्यांगांना तीनचाकी सायकल वितरण
समाजोपयोगी वस्तूंचा स्वीकार
कार्यक्रमात हार, फुले, शाल-सत्कार याला फाटा देऊन केवळ उपयुक्त वस्तूंचा स्वीकार करण्यात आला. हे वैशिष्ट्य ठळकपणे उपस्थितांनी अनुभवले. यावेळी डॉ. प्रा. विजय जाधव, ॲड. गजानन भाकरे, प्रा. राजेंद्र ठोंबरे, दिगंबर जगताप, सुरेश माळी, शहाजी गडहिरे, माळी प्रहार संघटना, मंगळवेढा यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
