सिंहगड इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल मार्फत व्याख्यानाचे आयोजन
विद्यार्थ्यांनी स्टार्टअप व कंपनी सुरू करण्याविषयी प्रश्न विचारले तसेच चिंचणीकर सरांनी विद्यार्थ्यांच्या शंकेचे निराकरण केले

पंढरपूर/ हेमा हिरासकर : सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूरमध्ये दि २२ फेब्रुवारी रोजी “हाऊ टू प्लॅन फॉर स्टार्ट अप : लीगल अँड इथिकल स्टेप्स” या विषयावर एकदिवसीय व्याख्यान संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक म्हणून तुकाराम चिंचणीकर उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. दरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली व स्टार्टअपचे महत्व समजावून सांगितले.
तुकाराम चिंचणीकर यांनी स्टार्टअप कसे सुरु करावे याबद्दलची माहिती दिली तसेच कंपनीचे विविध प्रकार प्रोप्रायटरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक, प्रोडूसर कंपनी इत्यादी विषयी माहिती दिली. तसेच सदर कंपनीसाठी नोंदणी प्रक्रिया व त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे यांची ही माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्टार्टअप व कंपनी सुरू करण्याविषयी प्रश्न विचारले तसेच चिंचणीकर सरांनी विद्यार्थ्यांच्या शंकेचे निराकरण केले. या कार्यक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल मार्फत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रमुख पाहुण्याचे आभार कुमारी अयमन बेद्रेकर व कुमारी वेदिका डुबल यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक इनक्यूबेशन सेलचे प्रमुख डॉ. अतुल आराध्ये तसेच धनंजय गिराम, रमेश येवले, किशोर जाधव, अनिता शिंदे, मिलिंद तोंडसे आदि सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.