पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात “मल्टिपल अँटेना टेक्निक्स फॉर वायरलेस कम्युनिकेशन चॅनल्स’ या विषयावर व्याख्यान संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी मल्टिपल अँटेना टेक्निक्स फॉर वायरलेस कम्युनिकेशन चॅनल्स या विषयावर प्रा. अमोल भोसले , पुणे यांचे व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्रा.अमोल भोसले यांचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलांणी यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले. तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अँटेना या विषयाबद्दल मूलभूत संकल्पना, तसेच सध्याच्या युगातील अँटेनाचे तंत्रज्ञान याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
प्रा.भोसले यांनी विद्यार्थ्यांना अँटेनाचा वापर डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ॲटोमेशन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये कसा करता येतो याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे विस्तृतपणे वर्णन केले. विद्यार्थ्यांनी व्याख्यानादरम्यान विचारलेल्या प्रश्नांना प्रा.भोसले यांनी सखोल उत्तरे दिली. व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये एंटीनाचा वापर व तंत्रज्ञान याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यातील संधींबाबत त्यांना नवीन दृष्टिकोन मिळाला आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. वैभव गोडसे, प्रा. महेश झाडे, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अलीना इनामदार आदिसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.