सिंहगड महाविद्यालयात“उद्योजकता विकास”यावर व्याख्यान संपन्न
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन

पंढरपूर/हेमा हिरासकर: एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीयर्स (IETE) यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रोविंग युवर एंटरप्रेन्युर माईंडसेट अँड स्किल्स” या विषयावर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
सदरील व्याख्यानासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ. माधुरी इंगोले यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंट आणि यशस्वी करिअरसाठी आवश्यक ठरणाऱ्या रेझिलियन्स या महत्त्वाच्या कौशल्यांबाबत सखोल माहिती देण्यात आली. तसेच भविष्यातील संधी आणि विविध नामांकित कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या व्याख्यानात 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मिळालेले मार्गदर्शन त्यांना भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमृता माळी, स्वप्निल टाकळे, वैभव गोडसे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
Happy Holi 2025 : देशभरात होळीचा उत्साह, जाणून घ्या कशी झाली सुरुवात