शेकाप भाजप
सांगोला : सांगोल्यातील भाजपच्या एका कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) अनेक बडे नेते उपस्थित राहिल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात नवे वारे वाहू लागले आहेत. राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याचे संकेत मिळत असून, शेकापमधील काही जुने शिलेदार भाजपच्या दिशेने जाताना दिसत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शेकापमधील अनेक नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र सांगोल्यातील कार्यक्रमाने त्या चर्चांना अधिक बळ दिले आहे. विशेष म्हणजे, काही शेकाप नेते एका कार्यक्रमात व्यासपीठावरही बसले होते, जे राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानले जात आहे.
भाजपकडून खुले संकेत
सोलापूरचे पालकमंत्री यांनीही सूचक विधान करत केले की, पक्षवाढीच्या दृष्टीने भाजप विविध ठिकाणी काम करत आहे. इतर पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असून, लवकरच ते पक्षात सामील होतील, अशी अपेक्षा आहे.
या वक्तव्यानंतर शेकापमधील काही बड्या नेत्यांचा भाजपप्रवेश निश्चित असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
स्व.डॉ.गणपतराव देशमुखांची सावली असलेल्या शिलेदारांचा नवा प्रवास?
राज्यात एकेकाळी स्व.डॉ.गणपतराव देशमुखांसारख्या मातब्बर नेत्यासोबत काम केलेल्या शेकापच्या जुन्या नेतृत्वातील मंडळींना आता भाजपच्या विचारसरणीकडे झुकताना पाहणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. यामागे स्थानिक पातळीवरील बदलती सत्ता समीकरणे, आगामी निवडणुकीची रणनीती, आणि शेकापमधील सत्ताधारी पोकळी अशी अनेक कारणं असू शकतात.
राजकीय समीकरणांची नवी दिशा?
सांगोला आणि परिसरात भाजप-शिवसेना युती सक्रिय असताना, शेकाप नेत्यांचा वाढता भाजप आणि अनेक ठिकाणी एकत्रित उपस्थितीमुळे हा पक्षदेखील सांगोल्यात अधिक बळकट होण्याच्या मार्गावर आहे.
शेकापला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमुळे सांगोला तालुक्यातील राजकारणाची दिशा आणि दशा बदलणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
