शैक्षणिकसांगोला

लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंदचे राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार यश!


सोनंद / प्रतिनिधी: येथील लक्ष्मीदेवी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव आनंदराव भोसले यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

इयत्ता दुसरीतील विद्यार्थी ओम अंतोष सोळगे याने घेरडी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्य पातळीवर त्याने 13 वा क्रमांक मिळवला आहे. याच इयत्तेतील संस्कृती विजयकुमार भिंगे हिने राज्य स्तरावर 20 वा क्रमांक प्राप्त केला आहे. इयत्ता तिसरीतील संस्कृती तात्यासाहेब खांडेकर हिने केंद्र स्तरावर चौथा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता चौथीमधील स्वरा वल्लभ कोकाटे आणि आरोही अमोल गायकवाड या दोघी विद्यार्थिनींनीही केंद्र स्तरावर प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेतही लक्षणीय यश:

यासोबतच, शाळेतील १७ विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल आर्ट कॉम्पीटिशन स्पर्धेतही उल्लेखनीय यश मिळवले आहे. या स्पर्धेत चार विद्यार्थ्यांनी मेडल आणि भेटवस्तू प्राप्त केल्या आहेत, तर नऊ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल आणि उर्वरित चार विद्यार्थ्यांनी प्रशस्तीपत्र पटकावले आहे.

या दोन्ही स्पर्धांमधील विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक यशाबद्दल संस्था सचिव आनंदराव भोसले, संस्था सदस्या सौ. रजनी भोसले, मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महाकाळ, प्राचार्य हेमंत आदलिंगे, पर्यवेक्षक सुभाष आसबे आणि सर्व शिक्षक-शिक्षिका यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना संस्था सचिव आनंदराव भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले आणि त्यांनी यापुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयारी करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्था नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता बोराडे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती जयप्रभा शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. आबासाहेब कोळी यांनी मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button