जिल्हा स्तरावर चमकले ग्रामीण भागातील विद्यार्थी, लक्ष्मीदेवी सोनंदचे गणित परीक्षेत घवघवीत यश
सोलापूर येथे होणार्या प्रज्ञा परीक्षेसाठी दोघांचीही निवड

सांगोला/अविनाश बनसोडे : सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत आयान अमजद मुजावर व प्रतिक दिगंबर हिप्परकर यांनी चमकदार केली. या दोघांनी लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलाचे नाव उंचावले आहे. ग्रामीण भागात राहूनही जिल्हा स्तरावरील स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल परिसरातील पालकांमधून कौतुक होत आहे.
एप्रिल महिन्यात सोलापूर येथे होणार्या प्रज्ञा परीक्षेसाठी या दोघांचीही निवड झाली आहे. दोघांचाही शाळेमध्ये भव्य सत्कार करण्यात आला.
टेंभु प्रकल्पाच्या पाणी व्यवस्थापनावर महत्त्वाची बैठक, जलसंपदा मंत्री, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यात चर्चा
शिक्षण संकुलात क्रीडा, सांस्कृतीक तसेच शैक्षणिक प्रगती याबरोबरच चांगले संस्कारही दिले जातात. १२ वी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी एम.एच.टी.,सी.ई.टी.च्या कोर्सचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यातून विद्यार्थ्यांचा परगावी जाण्याचा, राहण्याचा खर्च बचत झाला असून पुणे,मुंबई,लातूर,कोल्हापूर इ.मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याऐवजी सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भगात तसे शिक्षण मिळत आहे शी माहिती शिक्षकांनी दिली.