आताsss ती निघाली बोल्ड अंदाजात दुध काढायला; हिला पाहून तिची झाली दैना…ग्लॅमरस अभिनेत्रीचा देसी स्वॅग!

Nia Sharma Viral Video : छोट्या पडद्यावरील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा सध्या ‘लाफ्टर शेफ 2’ (Laughter Chefs 2) मध्ये झळकत आहे. ती आपल्या जोडीदार सुदेश लहरीसोबतच्या मिश्किल नोक-झोकीमुळे अनेकदा चर्चेत असते. मात्र यावेळी नियाने असं काही केलंय की तिचा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आणि हसून हसून लोटपोट झाले.
निया शर्माचा (Nia Sharma Instagram) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात देशी स्टाईल दाखवत सेटवर म्हशीचे दूध काढताना दिसत आहे.
निया शर्मा (Nia Sharma) म्हशीचे दूध काढताना
नियाने तिच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ‘लाफ्टर शेफ 2’च्या सेटवर म्हशीचे दूध काढताना दिसते. तिचा हा हटके अंदाज आणि ग्लॅमरस लूक प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आला आहे. एका बाजूला तिच्या बोल्ड स्टाईलची चर्चा आहे, तर दुसरीकडे म्हशी समोरचा तिचा देसी स्वॅग चाहत्यांना विशेष आवडला आहे.