क्रीडा
कोल्हापूरचे हॉकीपटू चमकले! आंध्रप्रदेश येथील नागरी सेवा हॉकी स्पर्धेसाठी ११ खेळाडूंची निवड
खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याच्या जोरावर ही संधी मिळवली

कोल्हापूर/राजू मुजावर : आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या संघात कोल्हापूरच्या ९ खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होतात.
महाराष्ट्र राज्याच्या १८ सदस्यीय संघात कोल्हापूरचे ९ खेळाडू निवडले गेले आहेत,ही कोल्हापूरसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
संघातील कोल्हापूरचे खेळाडू :
- राहुल शिंदे (औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर)
- असिफखान पठाण (भूमी अभिलेख, पन्हाळा)
- इरफान सनदी (तहसील कार्यालय, भुदरगड) – संघाचा कर्णधार
- निफाज शेख (राज्य कर आयुक्त कार्यालय, मुंबई)
- दिनेश मळेकर (पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर) – गोलकीपर
- अझहर शेख (जिल्हा कृषी कार्यालय, कोल्हापूर)
- मानव नलगे (औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर)
- विकास पाटील (राज्य कर आयुक्त कार्यालय, मुंबई)
- आशुतोष पाटील (जलसंपदा कार्यालय, अमरावती)
यापैकी इरफान सनदी यांच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, उपकर्णधार म्हणून असिफखान पठाण यांची निवड झाली आहे. ही निवड कोल्हापूरच्या हॉकी क्षेत्रासाठी मोठी प्रतिष्ठेची बाब असून, या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याच्या जोरावर ही संधी मिळवली आहे.