सांगोला : सांगोला महाविद्यालयात केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे पत्रकार, समाज सुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी व वक्ते होते. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. समाज सुधारणांमध्ये त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा कार्याचा आदर्श घेऊन समाजाविषयी चांगले कार्य करावे असे विचार महाविद्यालयातील प्रा. डॉ. राम पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन आय. क्यू. ए. सी. कोऑडीर्नेटर डॉ. राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री. विलास माने यांनी सहकार्य केले. तसेच श्री बाबासो इंगोले यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
