पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या भेटीचा सविस्तर कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शनिवार, दुपारी ३.३० वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार असून, तेथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण करतील.
दुपारी ४.३० वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आयोजित ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरणविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर सायं. ५.३० वाजता ते शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे मुक्काम करतील.
यानंतर रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २.०० वाजता, उपमुख्यमंत्री शिंदे श्री विठ्ठल–रूक्मिणी मंदिराकडे प्रयाण करतील. पहाटे २.२० वाजता तेथे कार्तिकी वारी निमित्त शासकीय महापूजा पार पाडली जाईल.
महापूजेनंतर पहाटे ४.३० वाजता ते पुन्हा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील व ४.४५ वाजता आगमन करून विश्रांती घेतील. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता उपमुख्यमंत्री शिंदे मोटारीने सोलापूर विमानतळावर रवाना होतील.
दुपारी १२.०० वाजता ते सोलापूर येथून शासकीय विमानाने अमृतसरकडे प्रयाण करतील. या दौऱ्यादरम्यान पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीचे आयोजन, पर्यावरण जनजागृती उपक्रम तसेच शासकीय तयारीचा आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
