
ऑनलाईन डेस्क : टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक अशा सुंदर अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या फिटनेससाठी विशेष ओळखल्या जातात. आज आपण अशाच एका देखण्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत. या अभिनेत्रीने टीव्हीच्या दुनियेत खूप नाव कमावले. तिच्या टीव्ही भूमिकेसाठी तिला आजही लोक विसरू शकलेले नाहीत.
46 वर्षांची असतानाही ती अतिशय स्लिम आणि फिट दिसते. ती इन्स्टाग्रामवर नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. खऱ्या आयुष्यात ती खूप बिनधास्त आहे. तिचे बोल्ड फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आपण बोलत आहोत टीव्हीच्या सुंदर अभिनेत्री काम्या पंजाबीबद्दल. आज काम्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती आज टीव्ही जगतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
काम्या शो बिग बॉसमध्येही सहभागी झाली आहे. तिने टीव्हीवर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली काम्या नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. काम्या जिथे कुठे सुट्ट्या घालवायला जाते, तिथले फोटो ती हमखास शेअर करते.