जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

सोलापूर/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. प्रारंभी ध्वजारोहण नंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन झाले.

प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण- महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मध्ये सकाळी 6:45 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार समीर यादव, तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.