के.ए.पी विधी कॉलेज पंढरपूरची धर्मार्थ गौरक्षण संस्थेला शैक्षणिक भेट

पंढरपूर : दिनांक 22 मार्च 2025 रोजी के ए पी विधी कॉलेज पंढरपूर यांनी ट्रस्ट अँड इक्विटी या विषयासंदर्भात शैक्षणिक विजिट दिली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे KAP LAW COLLEGE च्या प्राचार्य सौ. सोनकांबळे मॅडम यांनी भूषविले या कार्यक्रमावेळी धर्मार्थ गौरक्षण संस्थेचे व्यवस्थापक श्री.दुनाखे यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व श्री.ॲड.कवचाळे सर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी ट्रस्ट अँड इक्विटी विषयाचे प्राध्यापक श्री विनायक सरवळे सर व KAP law कॉलेज चे UR साहिल शेख यांनी उत्तम रीत्या पार पाडले सर्वप्रथम प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सत्कार करून स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल शेख यांनी केले यानंतर संस्थेचे व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांना या संस्थेची व्यवस्थित सर्व अकाउंट घटना इत्यादी कागदपत्र दाखवून माहिती दिली.
सिंहगड महाविद्यालयात ‘गृह वापरासाठी सौर ऊर्जा प्रणाली डिझाइनचे’ चर्चासत्र
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या संख्येचे निरसन केले यानंतर के ए पी कॉलेजच्या प्राचार्य सोनकांबळे मॅडम त्यांचे मनोगत व्यक्त केले यानंतर विद्यार्थ्यांमधून निकिता खबाले अर्थव उत्पाद,त्वरिता वाघ, महादेव बागल, यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले या सर्व कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली व ते आभार प्रदर्शन साहील शेख यांनी केले.