महाराष्ट्रसांगोला

ना.जयकुमार गोरे यांचा आज सांगोल्यात भव्य नागरी सत्कार


सांगोला/श्रीराम देवकते : राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा 3 एप्रिल 2025 रोजी सांगोल्यात भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृहात सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा करतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता आयुक्त सोलापूर म.न.पा., जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करतील.

सकाळी 11 वाजता लिंगशेट्टी कार्यालयात भारतीय जनता पार्टी जिल्हास्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट देतील. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाकडील आढावा बैठकीस उपस्थित राहतील.

सायंकाळी 6 वाजता पंढरपूर येथे समस्त वारकरी मंडळ गोंदवले बु. ता. माण यांचे नियोजित वास्तूचे भूमिपूजन करतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता सांगोला येथे आगमन होईल. मा. आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी आमदार यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देतील. सायंकाळी 7.15 वाजता राजयोग अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा.लि. सांगोला यांच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील.

सायंकाळी 7.30 वाजता सांगोला तालुक्याच्यावतीने जाहीर सत्कार स्वीकारतील. रात्री 8.30 वाजता चेतनसिंह केदार सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण यांच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट देतील. रात्री 8.55 वाजता बाळासाहेब एरंडे यांच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट देतील. त्यानंतर रात्री 9.30 वाजता बोराटवाडी ता. माण जि. सातारा येथे प्रयाण करतील.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button