
विशेष प्रतिनिधी : गायक संजू राठोड याचं ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच या गाण्याला मिलियनच्या घरात व्ह्यूज मिळाले असून याच गाण्यावर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जान्हवीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट करत या ट्रेंडिंग गाण्याला आपली स्टाईलिश अर्पण केली आहे.

या फोटोंमध्ये तिचा अंदाज आणि अदा चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

जान्हवी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने नवीन कार खरेदी केल्याचेही चाहत्यांना सांगितले होते.

त्या वेळी तिने पारंपरिक पोशाखात एक खास रील शेअर करत चाहत्यांचं मन जिंकलं होतं.

तसेच, जान्हवी ‘सूरज चव्हाण’ यांच्या ‘झापूक झुपूक’ या सिनेमातील गाण्यात दिसली होती.

‘वाजीव दाद्या’ या गाण्यावर तिने सूरजसोबत केलेला भन्नाट डान्स प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे.

सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटो पोस्टला जोरदार प्रतिसाद मिळत असून, ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
