Economy

अबबब! सोनं आज ९८ हजारांवर, लवकरच होणार लाखाचा आकडा पार! या कारणामुळे गाठली विक्रमी उंची


मुंबई : आज नवा उच्चांक गाठला आहे. प्रति तोळा सोनं तब्बल 98,000 रुपये झालं असून, केवळ 2,000 रुपयांनी ते एक लाखांचा टप्पा गाठेल. यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांची आक्रमक भूमिका कारणीभूत

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक व्यापार धोरण यामुळे जागतिक बाजारात मंदीच सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात तब्बल 1650 रुपयांची उंची गाठली.

त्यामुळे पुढील काही दिवसांत सोन्याचे दर एक लाखांचा आकडा पार करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अक्षय तृतीयेला दर लाखावर? 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया सण असल्याने सोन्याच्या खरेदी वाढेल का? या काळात सोन्याचे दर एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे

. त्यानंतर लग्नसराई आणि दिवाळीमुळेही दरात चढ-उतार राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button