बंगळुरू/विशेष प्रतिनिधी : भारताच्या आयटी राजधानीत समजल्या जाणाऱ्या बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली असून, तब्बल ५० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयटी कंपन्यांमधील ही कपात केवळ कंपन्यांच्या आर्थिक नियोजनाचा भाग नसून, उद्योग क्षेत्रातील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या चढ-उताराचे परिणाम असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आयटी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेली बंगळुरूची अर्थव्यवस्था आणि लाखो युवकांच्या रोजगाराच्या संधींवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेषतः नव्याने पदवीधर झालेल्या आयटी अभियंत्यांसाठी नोकरीच्या संधी आणणं हे आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरणार आहे.
