
सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील चिंचोली रोड परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत डाळिंब व इतर व्यापारांवर प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात येत नाही. (Safety of Women) नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. नगरपालिका, तहसील कार्यालय आणि कृषी विभागातील अधिकारी कारवाई न करता जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. (Safety of Women)
विद्यमान-माजी आमदार गप्प का ?
विद्यमान व माजी आमदार यांनी महिलांना येणाऱ्या अडचणी, महिलांचे संरक्षण करण्याचा शब्द दिला होता. परंतु आता त्यांचेच या सर्व प्रकारावर मौन आहे. (Safety of Women) या परिसरात परप्रांतीय असल्याकारणाने महिलांना व मुलींना घराबाहेर पडणे देखील अवघड होत आहे. परंतु प्रशासनाला कोणत्याही सूचना न देता गप्प का आहेत असा सवाल महिलांनी विचारला. (Safety of Women)
परप्रांतीय मजूर व व्यापारी बिनधास्तपणे वावर!
दरम्यान, या परिसरात परप्रांतीय मजूर व व्यापारी बिनधास्तपणे वावरत असल्याने स्थानिक महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. सुरक्षेचा गंभीर प्रश्न असताना प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. (Safety of Women) इन पब्लिक न्यूजशी बोलताना नागरिक म्हणाले, अधिकारी नेमकं कधी जागे होणार? फक्त एकमेकांकडे बोट दाखवत टाळाटाळ थांबवणार आहेत का? यावेळी संतप्त नागरिकांनी इशारा दिला आहे की, अधिक वेळ दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपययोजना आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
Education : सवाल जनतेचा : अरे बापरेsss! शिक्षणाच्या मंदिरातील एजंटचा सुळसुळाट? शिक्षणाचा काळाबाजार की स्वतःचा तुंबड्या भरून लाखोंची लूट?