RCB च्या गोलंदाजीची कमाल, कोहली-सॉल्टच्या खेळीने मोठा विजय
विराट कोहली आणि फिल सॉल्टने अर्धशतक झळकावले

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने IPL-18 चा उद्घाटन सामना जिंकला. संघाने गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 7 गडी राखून पराभूत केले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या KKR ने 8 गडी गमावत 174 धावा केल्या. RCB ने 16.2 षटकांत 3 गडी गमावत लक्ष्य गाठले.
न्यूझीलंडचा दणदणीत पराभव, रोहितच्या नेतृत्वाखाली ९ महिन्यांत दुसरे ICC विजेतेपद! पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…
बेंगळुरूकडून डावखुरा फिरकीपटू क्रुणाल पांड्याने 3 तर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने 2 गडी घेतले. फलंदाजीत विराट कोहली आणि फिल सॉल्टने अर्धशतक झळकावले. कर्णधार रजत पाटीदारने 16 चेंडूंत वेगवान 34 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने 56 आणि सुनील नरेनने 44 धावा केल्या.
RCB ने 3 वर्षांनंतर IPL मध्ये KKR ला पराभूत केले. संघाने शेवटचा विजय 2022 मध्ये मुंबईच्या मैदानावर मिळवला होता. या दरम्यान, कोलकाताने सलग 4 सामने बेंगळुरूविरुद्ध जिंकले होते. KKR चा पुढील सामना 26 मार्चला गुवाहाटीमध्ये राजस्थानविरुद्ध होईल, तर RCB 28 मार्चला चेन्नईमध्ये CSK विरुद्ध खेळेल.