
विशेष प्रतिनिधी : सांगोला पोलीस ठाण्याचे (Sangola Police Station) पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी एक महत्त्वपूर्ण आवाहन करत सांगितले की, शाळकरी मुलींची छेडछाड किंवा महिलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. (Sangola Police Station)
विनोद घुगे इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले,
“महिलांवरील अन्याय, छेडछाड किंवा त्रास खपवून घेतला जाणार नाही. अशा घटनांना थेट आणि कठोर कारवाईने प्रत्युत्तर दिले जाईल.” (Sangola Police Station)
पोलीस प्रशासन महिला सुरक्षेबाबत गंभीर असून बीट मार्शल, महिला पोलीस अधिकाऱ्यांची विशेष पथके कार्यरत आहेत.

जनतेला आवाहन :
कोणत्याही प्रकारच्या त्रासास सामोरे जावे लागत असल्यास, भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधा. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल व त्वरीत मदत केली जाईल. “सुरक्षित समाजासाठी पोलीस व जनता एकत्र आहे असे त्यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना संगितले. (Sangola Police Station)