
सोलापूर/प्रतिनिधी: माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे मंगळवार दि.29 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दि.29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता कलिना विमानतळ येथुन खाजगी विमानाने सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 8.00 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन सकाळी 8..15 वाजता सेालापूर विमानतळ येथून रस्तेमार्गे अक्कलकोटकडे प्रयाण, सकाळी 9.00 वाजता अक्कलकोट येथे आगमन व राखीव
श्री स्वामी समर्थ दर्शन, सकाळी 11.00 वाजता अक्कलकोट येथुन रस्तेमार्गे सोलापूर कडे प्रयाण, सकाळी 11.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन, दुपारी 12.00 वाजता सोलापूर विमानतळ येथून शिर्डी विमानतळकडे प्रयाण करतील.