महाराष्ट्र

महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याचा धोका! स्लीपर सेल सक्रिय; ‘हाय अलर्ट’ जारी


मुंबई / प्रतिनिधी :  भारत-पाकिस्तानदरम्यानच्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यावर दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, यामुळे मुंबई, पुणे, मालेगाव, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या संवेदनशील भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, राज्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यभरातील सुरक्षेचा आणि सज्जतेचा आढावा घेतला. ७ मे रोजी झालेल्या मॉक ड्रिलनंतर, प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल राबवली जाणार असून, तिथे जिल्हास्तरावरील वॉररूम्स तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘युनियन वॉर बुक’ चा अभ्यास करून संबंधित यंत्रणांना आवश्यक माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले.

तत्काळ प्रतिसादासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास आपत्कालीन निधी वितरित केला जाणार असून, तातडीच्या प्रस्तावांना एका तासात मंजुरी देण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी, मुंबईतील सैन्यदल, नेव्ही, एअर फोर्स व कोस्टगार्डच्या प्रमुखांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढील बैठकीत सहभागी करण्याची योजना आखण्यात आली आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button