भारताच प्रतिउत्तर; पाकिस्तानी हादरल! १० पाकिस्तानी सैनिकांना केले ठार

विशेष /प्रतिनिधी: बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइस) हल्ल्यात १० सैनिक ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ही घटना क्वेटा शहराच्या मार्गट उपनगरात घडली. लष्कराच्या ताफ्यावर रिमोट कंट्रोलच्या मदतीने स्फोट घडवून आणण्यात आला. हल्ल्यात लष्कराचं वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.
BLA चा इशारा – आणखी हल्ल्यांची शक्यता
BLA च्या प्रवक्त्या जियंद बलुच यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना पुढील काही दिवसांत आणखी हल्ले होण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही BLA ने जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केल्याचा प्रकार घडला होता.
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हल्ला
या घटनेला विशेष महत्व आहे कारण सध्या जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर क्वेटातील हा हल्ला पाकिस्तानसाठी आणखी डोकेदुखी ठरतोय.
सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
हल्ल्यानंतर बलुचिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि BLA यांच्यातील संघर्ष अधिक उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.