'Operation Sindoor'
दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं (Indian Army) ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेली कारवाई हे भारताचे ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुन्हा एकदा देश आणि नागरिकांवर झालेल्या कोणत्याही हल्ल्याला कधीही न झुकता कठोर उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध असून, अशा क्रूर कृत्यांना माफ केले जाणार नाही,’ असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या दोन ‘हॉप कमांडर्स’चा खात्मा करण्यात आला असून, दहशतवाद्यांचे अनेक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या यशस्वी मोहिमेबद्दल देशभरातून भारतीय जवानांचे कौतुक होत आहे.
“आपल्या शूर भारतीय लष्कराचा (Indian Army) प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की भारताच्या सुरक्षेवर कोणतीही आंच आली, तर त्याचे उत्तर कठोरच असेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
