Indian drones Pakistan's nuclear sites explosions Karachi Lahore
Operation Sindoor : पाकिस्तानच्या अणु ठिकाणांपर्यंत ड्रोन पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकामागोमाग एक स्फोट झाल्यामुळे लाहोर आणि कराचीमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या एकूण सहा शहरांमध्ये १२ ड्रोन स्फोट झाल्याच्या बातम्या आहेत. या ड्रोन हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लाहोरनंतर आता कराचीमध्येही स्फोट झाल्याची माहिती आहे. कराचीला पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानलं जातं. इथेही ड्रोनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. कराचीमधील स्फोटामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. स्फोट झाल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या मते, कराचीमध्ये ड्रोन स्फोट झाला असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पाक सैन्याने त्वरित त्या परिसराचा ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे कराचीतच पाकिस्तानची सर्व अण्वस्त्र साठवलेली आहेत.
या पार्श्वभूमीवर, कराचीत असा ड्रोन स्फोट होणे ही पाकिस्तानच्या सुरक्षेविषयक व्यवस्थेची मोठी चूक मानली जात आहे. कराचीमधील स्फोटाला सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी समजले जात आहे. बातम्यांनुसार, लाहोरमधील नेव्ही बेसजवळ आणि कराचीत आर्मी बेसवर स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
आता पर्यंत ६ शहरांमध्ये ड्रोन हल्ले
कराची, गुजरांवाला, लाहोर, चकवाल, घोटकी आणि उमरकोट या सहा शहरांमध्ये ड्रोन हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे सर्व भागांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. हे ड्रोन नेमके कुठून आले यावर पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. तसेच या हल्ल्यांची जबाबदारीही अजून कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
लाहोरमध्ये सर्वाधिक ३ ड्रोन स्फोट झाले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनुसार एकूण १२ स्फोट पाकिस्तानमध्ये झाले आहेत. लाहोरमध्ये लष्करी तळाजवळ ड्रोन स्फोट झाल्याचे समजते.
एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे फेल
या ड्रोन हल्ल्यांना रोखण्यात पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीम अपयशी ठरले आहे. विशेष म्हणजे बुधवारीच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संसदेच्या सभागृहात पाकिस्तानच्या वायुदलाची स्तुती केली होती. आता मात्र हल्ल्यांमुळे ती स्तुती धोक्यात आल्याचे चित्र आहे.
