देश- विदेशमहाराष्ट्रसांगोला
नवीन एस.टी.बसेसचा लोकार्पण आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला

सांगोला/प्रतिनिधी : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष वेधत सांगोला आगारासाठी नवीन एस.टी. बसेसची मागणी केली होती. राज्य सरकारने सांगोला आगाराला पाच नवीन बसेस मंजूर केल्या.
या बसेसच्या पूजन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता करण्याचे आयोजन केले होते. मात्र, आमदार देशमुख यांनी स्वतः पूजन न करता आगारातील चालक, वाहक, कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांना करू द्या असे सांगत पूजन केले.
सांगोला आगारात झालेल्या या पूजन कार्यक्रमात नवीन बसेसचे पूजन अगदी साधेपणाने, पण लोकभावनेचा सन्मान राखत सर्वसामान्यांच्या हस्ते पार पडले.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!