वाढदिवस विशेष वृत्त | इन पब्लिक न्यूज :
सांगोल्याच्या राजकारणात एक मोठीच घटना घडतेय
ती म्हणजे डॉ. बाबासाहेब देशमुख अजूनही न कळणं!
स्वर्गीय डॉ. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू, बाबासाहेब देशमुख यांच्या सुसंस्कृत, मूल्यनिष्ठ घराण्यात जन्मलेला हा नेता…
घरात समाजकारण–राजकारणाचा प्रचंड वारसा असतानाही, त्या वारशाचा गवगवा कधीच न करणारा,
“मी आहे” असं छातीठोकपणे न सांगणारा —
म्हणूनच बहुतेकांना तो कळलाच नाही!
विद्येचा डोंगर, पण अहंकाराचा कण नाही
पेनूरच्या जिल्हा परिषद शाळेपासून
सैनिक स्कूल तुळजापूर,
दयानंद कॉलेज लातूर,
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर,
डी. वाय. पाटील कोल्हापूर,
आणि थेट कोलकात्यापर्यंत सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजी…
इतकी अफाट शैक्षणिक पात्रता असलेला आमदार सांगोल्याला मिळणं हे भाग्य,
पण त्या विद्येचा माज न दाखवणं — हे नेतृत्वाचं लक्षण!
नवखे आमदार? हो… पण कामात वाघ!
हो, ते राजकारणात नवखे आहेत.
पण मागील तीन–चार वर्षांत त्यांनी सांगोला तालुक्याचा इंच न् इंच पिंजून काढला आहे.
कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले,
लोकांचे प्रश्न ऐकले,
आणि विधानसभेत सांगोल्याचा आवाज थेट सरकारच्या दालनात आदळवला!
हे भाषणांचे फटाके फोडणारे नेते नाहीत,
हे मुद्दे मांडून निर्णय घ्यायला भाग पाडणारे नेतृत्व आहे.
भयमुक्त सांगोला — हीच खरी ओळख
मागील काही वर्षांत सांगोला तालुक्यात जे भय, असुरक्षितता आणि दहशतीचे ढग होते,
त्यांना छेद देत
आज पुन्हा एकदा आबासाहेबांच्या काळातला
शांत, सुरक्षित, भयमुक्त सांगोला
उभा राहताना दिसतोय.
घटना घडतात…
आरोप होतात…
पण समाजमन ओळखणारा नेता
संयम, समजूतदारपणा आणि निर्मळ मनाने हे सगळं सोसतो —
हे सोपं नसतं!
आज वाढदिवस… उद्या इतिहास!
आज डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस आहे.
हा वाढदिवस केक कापण्यापुरता नाही,
तो एका न कळलेल्या पण घडत असलेल्या नेतृत्वाचा उत्सव आहे.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलित, वंचित, उपेक्षित घटकांसाठी
त्यांच्या हातून आयुष्यभर काम घडत राहो,
त्यांना दीर्घायुष्य लाभो,
आणि सांगोल्याला असा शांत पण धारदार नेता लाभला —
याचा अभिमान वाटत राहो…
इन पब्लिक न्यूजकडून डॉ. बाबासाहेब देशमुख आपणांस मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा!


