कोल्हापुरात येसूवहिनी या अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर/महेश गायकवाड: क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज पंचगंगा डायलॉग, एन आर आय पेरेंट्स अससोसिएशन, यांच्या माध्यमातून आज राम गणेश गडकरी हॉल येथे येसूवहिनी या अभिवाचन चा कार्यक्रम करण्यात आला.
‘मी येसूवहिनी’ एक हृद्य सांगितिक अभिवाचनाचा रविवारी प्रयोग
समिधा पुणे श्री दिलीप ठोसर, संगीता ठोसर, संजय गोखले विणा गोखले, विनोद पावशे, चित्रलेख पुरंदरे यांचे सत्कार नितीन वाडीकर, सावली केअर चे किशोर देशपांडे यांचा मार्फत करण्यात आला…
सदर अभिवाचना चा कार्यक्रम होताना सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग श्रोत्यांचा डोळ्यासमोर उभे राहिले…सावरकरनी लिहिलेली अनेक देशभक्तीपर गित, सवांद, पत्र त्यातील संवाद आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहिले.देश हा उभा सीमेवर नभ तरुण शक्तीनो स्वीकार करता का आव्हानाचा अंदमान मध्ये सावरकर आणि त्यांचे बंधूची भेट…. अंदमान मध्ये सावरकर ची भेट व्हावी म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकार कडे मागणी करत असताना येसूवहिनी इहलोकी गेल्यानंतर त्यांना भेटीची मान्यता असणारे पत्र मिळाले.काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर सावरकरचा घरातील एक एक प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे केले…
या वेळी महिलांना अश्रू अनावर झाले. कोल्हापूर मधील सावरकर प्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाला….55 वा प्रयोग उद्या सांगली मध्ये आहे.