
विशेष प्रतिनिधी : शहरात अनधिकृत डाळिंब व्यवसाय (Pomegranate) सुरू असून यावर ठोस कारवाई होत नाही. कारवाई करण्यासाठी नगरपालिका, पोलीस स्टेशन यांच्याकडून पुढाकार घेतला जात असताना तहसील कार्यालयाने मात्र मौन बाळगले आहे. एकमेकांवर बोट दाखवत या अनाधिकृत व्यवसायांवर कारवाईत जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? (Pomegranate)
अनधिकृत व्यापार चक्क एका भागातून दुसऱ्या भागात :
माध्यमांमधून बातम्या प्रसारित झालेनंतर अनधिकृत व्यापार चक्क एका भागातून दुसऱ्या भागात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यवसायाला कोणाचा वरदहस्त आहे आणि यातून नेमका “मलिदा” कोणाला मिळतोय, हा थेट सवाल जनतेने केला आहे. (Pomegranate)

यावर सर्वानीच मौन बाळगले…
या अनधिकृत व्यवसायाला नक्की कुणाचे पाठबळ आहे? या व्यवसायातून नक्की मोठ्या प्रमाणात मलिदा कोणाला मिळतोय असा सवाल जनतेने केला आहे.(Pomegranate)
दरम्यान, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असता आता मोठ्या प्रमाणात वाहण्याची गर्दी होऊन रस्ते जाम होताना शहरात चित्र दिसत आहे. शहरात आधीच सस्ते नाहीत यामुळे जनतेचे हाल होत आहेत. यावर सर्वानीच मौन बाळगले आहे.

नक्की आमदार की अधिकारी कोणाला मलिदा मिळतोय ?
तर या अनाधिकृत व्यवसायामुळे होणारी गर्दी यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. यावर कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही, यामुळे नक्की आमदार की अधिकारी कोणाला मलिदा मिळत आहे असा सवाल मात्र संतप्त नागरिकांनी केला आहे. (Pomegranate)

यावर ठोस तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.