सांगोला : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सांगोला शाखेतर्फे बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी सदानंद लॉन्स हॉल, मिरज रोड, सांगोला येथे भव्य पदाधिकारी बैठक, इंजि. रामचंद्र घुटुकडे यांचा अभिष्टचिंतन समारंभ तसेच आदर्श पत्रकार पुरस्कार व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता होणार असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत खा. समिरभाऊ भुजबळ प्रदेश कार्याध्यक्ष, डॉ. सुदर्शन घेरडे प्रदेश उपाध्यक्ष, प्रा. राजेंद्र कोळेकर सर संस्थापक अध्यक्ष, लक्ष्मी डेव्हलपर्स व लक्ष्मी एज्यु. सोसायटी, मा. आकाश पवार राष्ट्रीय अध्यक्ष, सुराज्य निर्माण सेना, आबासाहेब खारे सोलापूर जिल्हाध्यक्ष, गोरख चोरमुले सामाजिक कार्यकर्ते, भैरवनाथ बुरांडे सांगोला शहराध्यक्ष, डॉ. स्नेहाताई सोनकाटे प्रदेश सरचिटणीस, सिध्देश्वर आवारे संस्थापक, जय मल्हार युवा संघटना, राज माने उपाध्यक्ष, जय मल्हार युवा संघटना, सौ. सिमाताई एकतपूरे माढा लोकसभा महिला अध्यक्षा, हरीभाऊ गावंधरे जिल्हाध्यक्ष, चंद्रशेखर जाधव पंढरपूर तालुकाध्यक्ष, काशिनाथ पाल राष्ट्रीय अध्यक्ष, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, शंकर लिंगे राज्य उपाध्यक्ष, उल्हासभाऊ धायगुडे पाटील अध्यक्ष, ओमकाली हिंदवी स्वराज्य सेना प. महाराष्ट्र यांचा समावेश आहे.
याशिवाय जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सांगोला, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर परिसरातील नामांकित पत्रकार व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रमेश आलदर तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, प्रा. आर. वाय. घुटुकडे सांगोला विधानसभा उमेदवार २०२४ यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतनाचा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. हा सोहळा पत्रकारांचा सन्मान, समाजातील एकतेचा संदेश आणि संघटनात्मक बळकटी यासाठी महत्वाचा ठरणार आहे.