‘मी येसूवहिनी’ एक हृद्य सांगितिक अभिवाचनाचा रविवारी प्रयोग
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव यांनी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले

कोल्हापूर/महेश गायकवाड : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव यांनी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले. दोघांनाही अंदमान येथील काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तरीही एवढ्या संकटकाळात त्यांच्या कुटुंबातील महिलांनी असीम त्याग केला. मनोधैर्य टिकवून ठेवले.
बाबाराव सावरकरांच्या पत्नी येसुवहिनी यांनी सगळ्या कुटुंबाला धीर दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर तर त्यांना मातेसमान सन्मान, आदर देत असत. त्या काळातील त्यांची मनस्थिती, भावना, त्याग, हे सर्व आपल्यासमोर समिधा पुणे यांचा वतीने प्रथमच प्रत्यक्ष वाचन, संगीत आणि कवितेच्या माध्यमातून मांडण्यासाठी घेऊन येणार आहेत मी… येसुवहिनी हा कार्यक्रम. आजपर्यन्त या अभिवाचनांचे महाराष्ट्रमध्ये 53 प्रयोग यशस्वी रित्या पार पडले आहेत.
ॲड. शहाजीबापू पाटील पुन्हा आमदार होणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार शिष्टमंडळ
अश्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन पंचगंगा डायलॉग्स, एन. आर. आय. पेरेंटस असोसिएशन जनजागृती अभियान कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा प्रयोग रविवार दि. 16 मार्च, 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री राम गणेश गडकरी सभागृह, न्यू हायस्कूल, पेटाळा कोल्हापूर, येथे करण्यात आले आहे. तरी कोल्हापूर शहर व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचगंगा डायलॉग्स, एन. आर. आय. पेरेंटस असोसिएशन, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.