महाराष्ट्रराजकीयसांगोला

Big Breaking : निवडणुकीनंतर सांगोल्यात ऐतिहासिक क्षण: तिन्ही आमदार पहिल्यांदा एकाच मंचावर!

काही कारणांमुळे हे नेते कधीही एका व्यासपीठावर दिसले नव्हते.


सांगोला/रोहित हेगडे : सांगोल्यात आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात सांगोला तालुक्याचे आजी व माजी तिन्ही आमदार पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. 

गेल्या काही महिन्यांमध्ये शहर व तालुक्यात विविध कार्यक्रम झाले, मात्र काही कारणांमुळे हे नेते कधीही एका व्यासपीठावर दिसले नव्हते. मात्र, आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे हा ऐतिहासिक क्षण घडणार आहे.  या सत्कार समारंभासाठी तिन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येण्याचा हा प्रयत्न आहे, असे बोलले जात आहे. 


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button