Highest Paid Bhojpuri Actresses: या आहेत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री; कमाई पाहून व्हाल थक्क
या आहेत टॉप 5 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भोजपुरी अभिनेत्री

इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : भोजपुरी चित्रपटांमध्ये पुरुष कलाकारांवर जास्त चर्चा केली जाते, तर अभिनेत्रींच्या अभिनय आणि लावण्याचेही प्रेक्षक फिदा आहेत. या अभिनेत्री केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर स्टेज शोमध्येही धुमाकूळ घालतात. त्यांच्या अभिनयासाठी त्या मोठ्या प्रमाणावर मानधनही घेतात, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
भोजपुरी सिनेमा जसा खेसारी लाल यादव, पवन सिंह, आणि दिनेश लाल यादव (निरहुआ) सारख्या पुरुष कलाकारांसाठी ओळखला जातो, तसाच तो आता काही अभिनेत्रींसाठीही प्रसिद्ध झाला आहे. काही अभिनेत्री त्यांच्या अभिनयासाठी आणि स्टेज शोसाठी लाखोंचे मानधन घेतात. या आहेत टॉप 5 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भोजपुरी अभिनेत्री.
1. आम्रपाली दुबे:
आम्रपाली दुबे आणि दिनेश लाल यादव यांची जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. एका रिपोर्टनुसार, आम्रपाली एका चित्रपटासाठी 10 ते 15 लाख रुपये मानधन घेते. तर स्टेज शोसाठी ती 50 ते 80 हजार रुपये घेते.
2. काजल राघवानी:
काजल राघवानी ही भोजपुरी सिनेमातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. काजल एका चित्रपटासाठी 15 ते 20 लाख रुपये मानधन घेते. तर स्टेज शोसाठी ती 1 लाख रुपयांपर्यंत शुल्क घेते.
3. रानी चटर्जी:
रानी चटर्जी ही भोजपुरी सिनेमातील अनुभवी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी 25 ते 30 लाख रुपये मानधन घेते. स्टेज शोसाठी ती 1 ते 2 लाख रुपये घेते. रानी चटर्जी ही भोजपुरी सिनेमातील अशी अभिनेत्री आहे, जिने अनेक चित्रपटांना मेल कलाकारांशिवाय हिट केलं आहे.
4. मोनालिसा:
मोनालिसा केवळ भोजपुरी चित्रपटांमध्येच नाही, तर हिंदी टीव्ही शोमध्येही झळकली आहे. रिपोर्टनुसार, ती टीव्ही मालिकेच्या एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मानधन घेते. भोजपुरी चित्रपटासाठी ती 7 ते 10 लाख रुपये आणि स्टेज शोसाठी 30 ते 60 हजार रुपये शुल्क घेते.
5. अक्षरा सिंह:
‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंह ही केवळ अभिनयच नाही, तर गायनातही प्रवीण आहे. ती भोजपुरी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी ती 30 ते 40 लाख रुपये घेते, तर स्टेज शोसाठी 4 ते 5 लाख रुपये मानधन घेते.
भोजपुरी सिनेमा आता नव्या उंचीवर पोहोचला आहे आणि या अभिनेत्री त्याच्या यशस्वीतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.