IT कंपनीत धक्कादायक प्रकार! “१३ तास काम करूनही ‘स्लो’ ठरवलं!” तरुणाचा सोशल मीडियावर भावनिक उद्रेक

विशेष प्रतिनिधी : एका आयटी कंपनीत नुकतीच नोकरी सुरू केलेल्या तरुण फ्रेशरने सोशल मीडियावर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. संबंधित तरुणाने सांगितले की, एका क्लिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी त्याने तब्बल १३ तास काम केले. काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तो आनंदी होता, मात्र टीम मीटिंगदरम्यान मॅनेजरने सर्वांसमोर त्याला “तू खूप स्लो आहेस” असे म्हणत ओरडले. या अनुभवामुळे मी मानसिकदृष्ट्या खचून गेलो आहे, असे त्याने रेडिटवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.
मॅनेजरने फ्रेशरवरच टाकला ठपका
घटनांमध्ये इतक्यावरच भर पडला नाही. जेव्हा एका टेक एक्सपर्टने कामाला उशीर का झाला, हे विचारले, तेव्हा मॅनेजरच्या टीममधील एका वरिष्ठाने संपूर्ण जबाबदारी फ्रेशरवर ढकलली. टेक एक्सपर्टच्या मते, कामाची गती कमी असण्यामागे काही आवश्यक फाईल्स गहाळ असण्याचे कारण होते.
फ्रेशरने शेवटी लिहिले की, “मी शिकतोय, मेहनत करतोय आणि चुका सुधारतोय, पण अशा अपमानास्पद वागणुकीमुळे आत्मविश्वास डळमळीत होतोय.”