विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यात प्रचंड पाऊस सुरू असून अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले तर नाल्यांचे बांध फुटल्याने उभ्या पिकात पाणी आहे.
दरम्यान, पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रस्थापितांनी पाण्यात जाऊन फोटो काढले. परंतु लोकांना मदतीची गरज असताना फक्त पाहणी करून आश्वासने करण्यात आली आहेत. असा घनाघाती शिवसेना नेते दादा लवटे यांनी केला.
पुढी बोलताना ते म्हणाले, आम्ही फोटोसाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी आहोत. आम्हाला बापूंनी सांगितले आणि आम्ही मदत घेऊन लोकांमध्ये आलो. आम्ही दिखावा करत नसून जनतेची सेवा करतो असे ते म्हणाले.
प्रस्थापितांकडून फक्त पाहणी केली जाते, पाण्यात जाऊन फोटो काढले जातात हे फक्त लोकांना दिखावा करण्यासाठी आहे का ? पाण्यात जाऊन फोटो काढणे महत्त्वाचे की लोकांना मदत करणे ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
आम्ही तुमच्यासोबत आहोत : शहाजी बापू पाटील
दरम्यान, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी लोकांच्या वेदना समजून घेतल्या. यानंतर त्यांनी तात्काळ दुसऱ्याच दिवशी अन्नधान्य, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केला. तसेच पाऊस अजून किती काळ आहे, किती येणार आहे याचा अंदाज बांधणे कठीण आहे असे सांगत लोकांना कोणत्याही काहीही कमी पडू नये अशा सूचना देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच प्रशासनाला दिल्या. ज्या भागात मदत लागेल त्या भागात आम्ही तुमच्यासोबत आहोत असे शहाजी बापू पाटील म्हणाले.
एक कॉल प्रॉब्लेम सॉल : नागरिक
यावेळी नागरिक बोलताना म्हणाले, ऐन नवरात्रीच्या सणात घरात पाणी शिरले, बांध फुटून रानात पाणी उभ्या पिकात उभे आहे. विजेची सोय नाही. अन्नधान्य नाही. आम्हाला मदत करणे पाहिजे. फोटो काढण्यापेक्षा आम्हाला जीवनावश्यक वस्तू मिळाल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते असे संतप्त नागरिकांनी म्हटले.
शहाजी बापू पाटील यांनी दिलेला शब्द पाळला!
दरम्यान शहाजीबापू पाटील यांचा दौरा झाला आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. यानंतर तात्काळ त्यांनी आम्हाला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. शहाजीबापू पाटील यांनी दिलेला शब्द पाळला असे नागरिकांनी म्हटले.
