देश- विदेशसांगोला
“आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची पंचायत राज समितीवर नियुक्ती”

सांगोला / प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पंचायत राज समितीवर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कामकाजावर विधिमंडळामार्फत नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायतराज समिती कार्यरत असते. या समितीत विधानसभेतील २० व विधानपरिषदेमधील ५ अशा एकूण २५ सदस्यांची निवड केली जाते. ही समिती जिल्हा परिषदांना मिळणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होत आहे का, यावर लक्ष ठेवते.
समितीच्या कार्यपद्धतीनुसार, तिच्या बैठका गोपनीय असतात आणि त्या सभागृहात अहवाल सादर होईपर्यंत उघड करता येत नाहीत. समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यापूर्वी कोणत्याही सदस्यास या संदर्भात सभागृहात प्रश्न विचारता येत नाही.